0बॉलिवूडचे लव्‍हली कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या  ग्रॅण्‍ड लग्‍नसोहळ्याची चर्चा अजूनपर्यंत सुरू आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला त्‍यांनी थाटामाटात इटलीत लग्‍नाच्‍या बंधनात अडकले गेले. तेव्‍हापासून ते आजपर्लंत सगळीकडे दीपवीरच्‍या लग्‍नाच्‍या चर्चा सुरु आहेत. बंगळुरूत लग्‍नाचे त्यांनी ग्रॅण्‍ड रिसेप्शनही दिले.
ता रणवीरची बहीण रितीका हिने नवविवाहीत जोडप्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या पार्टीत उपस्‍थित लोकांना रणवीर सिंह दीपिकाची ओळख करुन देताना असे काय म्‍हणाला, ज्‍यामुळे दीपिका लाजून लाल झाली. रणवीर म्‍हणाला, मी जगातील सर्वात सुंदर मुलगीसोबत लग्‍न केले आहे. रणवीरच्‍या तोंडून हे वाक्‍य ऐकून दीपिका चक्‍क लाजली व एवढेच नाही तर हसलीही. 
अतरंगी रणवीर या पार्टीत  त्‍याच्‍या नेहमीच्‍या अतरंगी स्‍टाईलमध्‍ये दिसला. तर दीपिका नेहमीप्रमाणे  रॉयल लूकमध्ये दिसली. या कार्यक्रमात रणवीरने दीपिकासोबत धमाल डान्सही केला. १ डिसेंबरला मुंबईत पुन्हा त्यांच्‍या लग्‍नाचे रिसेप्शन होणार आहे.

Post a Comment

 
Top