0
तलवारीने केक कापल्या प्रकरणी भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक

     : सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्या प्रकरणी तामकडे येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह हरीश पाटील (वय 31) याच्यावर पाटण पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गुरुवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी पाटण तालुक्यातील तामकडे येथील भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमरसिंह हरीश पाटील (वय 31) याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस तामकडे गावात रात्रीच्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी मित्रांच्यासोबत साजरा करण्यात आला. त्यावेळी अमरसिंह पाटील यांनी तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केले होते. हे फोटो सोशल मीडियावर पाहिल्यानंतर पाटण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रशांत दिलीपराव चव्हाण यांनी अमरसिंह पाटील याच्यावर तलवारीने केक कापल्या प्रकरणी फिर्याद दाखल करून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून अमरसिंह पाटील याला अटक करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार के. आर. खांडे करत आहेत.

Post a Comment

 
Top