सोलापूर - साेलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते व नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाला असून याप्रकरणाची चौकशी करून आरोपी तत्काळ अटक करावी. विषप्रयोग करणारे मोठे व्यक्ती असू शकतात. पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे या मागणीसाठी सुरेश पाटील मित्र परिवार व सर्व पक्षीयांच्या वतीने बुधवारी साेलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात सुमारे चार ते पाच हजार नागरिकांचा सहभाग होता. या वेळी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर अकरा महिन्यापूर्वी विषप्रयोग करण्यात आला. पाटील मुंबईत उपचार घेत असताना हे निष्पन्न झाले. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी सुरेश पाटील मित्र परिवारांच्या वतीने भवानी पेठेतील पाटील यांच्या कार्यालपासून मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, पाटील यांच्यावर कोणी आणि कुठल्या कारणाने विषप्रयाेग केला, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment