0

सातारकर मनात आणलं की काहीही करु शकतात. फक्त मनात आणवे लागते असाच हा सातारी बाणा. साताऱयातील केतन पवार नावाचा युवक आता सुखन या प्रसिध्दीच्या लाटेवर असलेल्या उर्दू गजल, कव्वाली व शेरोशायरीने नटलेल्या कार्यक्रमाच्या टीमबरोबर अमेरिकेच्या दौऱयावर जात आहे. उद्या सुखनची टीम अमेरिकेला जाणार असून दीड महिन्याच्या दौऱयात सुखनचे 18 शो होणार आहेत. साताऱयातील या तबलावादक युवकाची वादन व अभिनय क्षेत्रातील वाटचाल ही निश्चितपणे कौतुकास्पद आहे.
सातारच्या कला क्षेत्रात एक से बढकर एक कलावंत होवून गेले आहेत. काहींना व्यासपीठ मिळत गेले ते यशाच्या शिखरावर पोहोचले. सातारमध्ये राहून कला क्षेत्रात उत्तुंग मिळत नाही याची खंत प्रत्येक कलावंतांच्या मनात असते. अशी खंत असलेल्या साताऱयातील सुनील पवार यांचा हा मुलगा केतच्याही मिनात होती. केतनचे आजोबा रामभाऊ पवार हे चांगले कानसेन आणि गानसेनही औंधचा शास्त्राrय संगीत महोत्सव आयोजनात पवार कुटुंबियांचे मोलाचे योगदान असते. या सांगितिक परंपरेतून केतन लहान असताना त्याला तबलावादनाचे वेड लागले. शाळा शिकत तबलावादनाचे धडे घेत असतानाच केतनला तबलावादक पं. आनंद शिधये यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. पवार कुटुंबियावरील प्रेमापोटी पं. आनंद शिधये पुण्याहून साताऱयात येवून केतनला शिकवत होते. केतनही पं. शिधये यांच्या मार्गदर्शनाखाली तबलावादनात प्रगती केली.
पुढे उच्च शिक्षणासाठी केतन पुण्यात गेला, तिथे शिक्षण घेत असताना पुण्यात खुद्द तालयोगी पद्यमविभुषण पं. सुरेश तळवलकर यांचा शिष्य होण्याचे भाग्य लाभले आणि मग केतनची तबलावादनात चांगली प्रगती झाली. शिकत असताना मोठमोठया कलावंतांच्या मैफिली ऐकत असताना तो काहींना तबला वादनाची साथ करु लागला. पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर कलावंतांशी संबंध येवू लागला आणि केतनकडे कोणतेही रंगरुपडे नसताना त्याला बालवयातच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2011 साली ‘शाळा’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यातील त्याची भूमिकाही चांगली गाजली. अभिनयाची पाठशाळा घरातच होती कारण केतनचे वडील सुनील पवार हे गायन, नाटक या साताऱयातील कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. बापाच्या मनातील चित्रपटात जायचे स्वप्न मात्र केतनने पूर्ण केले कारण पुढे पोपट, खोपा, आजोबा, रिंगण, कट्टीबट्टी या मराठी चित्रपटात त्याने प्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले, अतुल कुलकर्णी, अमेय वाघ यांच्याबरोबर काम केले आहे. या अभिनयातील वाटचालीचा म. टा. सन्मान, झी टॉकीज ऍवॉर्ड, मिफ्ता ऍवॉर्डने सन्मान झालेला आहे.

Post a Comment

 
Top