0

25 मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी

paytm money app launched mutual funds
बिझनेस डेस्क - म्युच्युअल फंड निश्चित परताव्याचा सुरक्षित मार्ग आहे. आपण म्युच्युअल फंडद्वारे बँकेच्या एफडी पेक्षा जास्त लाभ प्राप्त करू शकता. आता तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. ई-वॉलेट कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी पेटीएम मनी सुविधा सुरू केली आहे. पेटीएम मनी अॅपद्वारे आपल्याला मोबाइलवरून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

> पेटीएम मनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड खरेदी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. यासाठी पेटीएम मनी अॅप लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपद्वारे गुंतवणूदारांना म्युच्युअल फंडची खरेदी-विक्री करता येणार आहे.
2023 पर्यंत म्युच्युअल फंडचे गुंतवणूकदार 2 कोटींवरून 5 कोटी होतील असा कंपनीला विश्वास आहे.
पेटीएम मनीचा फायदा
> आपण स्वत: म्युच्युअल फंडमध्ये थेट गुंतवणूक केली तर आपल्याला यासाठी वेगळे कमीशन किंवा फीस देण्याची गरज नाही. थेट म्युच्युअल फंड खरेदी केल्यास 1 टक्का जास्त परतावा मिळतो. याप्रकारे पेटीएम मनीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
> पेटीएम मनी वर आपल्याला 25 मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये HDFC म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, आदित्या बिर्ला सन लाईफ, अॅक्सीस म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, SBI आणि रिलायंस सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
डिसेंबर पासून होणार डाउनलोड
> प्लेस्टोरवरून पेटीएम मनी अॅप डाउनलोड करता येणार आहे. पण यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण 4 डिसेंबरनंतर अॅप डाउनलोड होणार आहे. पेटीएमने सांगितले की, सुरूवातीला फक्त 2500 लोकांना हे अॅप डाउनलोड करता येईल. पण कालांतराने याची मर्यादा 10,000 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
> पेटीएमने सांगितले की, पेटीएम मनी लॉन्च होण्याआधीच साडे आठ लोकांनी रजिस्टर केले आहे. यामध्ये 96 टक्के लोकांनी मोबाइलवरून रजिस्टर केले आहे. विशेष म्हणजे 65 टक्के लोक हे छोट्या शहरातील रहिवासी आहे 

    Post a comment

     
    Top