0

शहरातील महात्मा गांधी चौकात गाडीसाठी वाट पाहत उभ्या असणारा तातोबा लक्ष्मण पुजारी (35, रा. कमलापूर, ता. सांगोला) हा ट्रकखाली सापडून ठार झाला. याबाबत मिरज शहर पोलिसांत फिर्याद नोंद आहे. ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला आहे.
   तातोबा पुजारी हे ऊस तोडीसाठी कागल येथे काही दिवसांपूर्वी आले होते. दिवाळी असल्याने ते गावी जाण्यासाठी मिरजेत आले होते. दुपारच्या सुमारास    महात्मा गांधी चौकात वॉन्लेस हॉस्पिटलसमोर ते आणि त्यांच्याबरोबर चार कामगार उभे होते. पंढरपूरकडे जाणाऱया ट्रकमधून जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी ते जाणारी वाहने थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी पंढरपूरकडे जाणारा एक ट्रक तेथे आला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न तातोबा करीत होते. ट्रकने वळणावर वळण घेतले. त्यावेळी तोल जाऊन तातोबा हे ट्रकखाली पडले. ट्रकच्या मागील चाकाखाली ते सापडले. डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच मयत झाले. त्यांच्याबरोबर असणाऱया कामगारांनी त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत रामचंद्र पुजारी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ट्रकचालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला आहे.

Post a Comment

 
Top