0
देशाचे पहिले गृहमंत्री असताना सरदार पटेल यांनी नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण करताना पाच एप्रिल १९६१ या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. आता याच सरदार सरोवरानजीकची सरदार पटेल यांची जगातील सर्वांत मोठी स्टॅच्यू ऑफ युनिटी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' : महाकाय भुकंप आला किंवा 180 किमी वेगाने चक्रीवादळं आले तरी पुतळा हलणार नाही!

पर्यटनाचा मुद्दा लक्षात घेऊन गुजरात सरकारकडून स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरामध्ये बोटींगची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. बोटींगला अडथळा येऊ नये यासाठी इंदिरा सागर प्रकल्पातून सरदार सरोवरामध्ये शेतीचे पाणी वळविण्यात आले आहे. इंदिरा सागरमधील शेतीचे पाणी वळविल्याने दुष्काळग्रस्त कच्छमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीमुळे नर्मदा कालव्यामधून पाणी चोरीच्या घटना घडत असून लोकांनी पाण्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत.

अधिक वाचा : अंतराळातूनही स्पष्ट दिसतो ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

जगातील द्वितीय क्रमांकाचा असलेल्या सरदार सरोवरावर तब्बल ३ हजार कोटी रुपये खर्च करून पटेलांची स्टॅच्यू ऑफ यूनिटी साकारण्यात आली. स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा लोकार्पण सोहळा अत्यंत धुमधडाक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. असे असले तरी सिंचनासाठी याच सरदार सरोवरातून काढण्यात येत असलेल्या कालव्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. इतकेच नव्हे तर कच्छमध्ये भीषण दुष्काळ असून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. 

अधिक वाचा : भारताचा पाकला झटका, सार्कचे निमंत्रण नाकारले

कच्छमध्ये भीषण पाणीसंकट निर्माण झाले आहे. लोक त्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. कच्छ विभागातील अनेक शहरांमध्ये पाण्यासाठी आंदोलनांचा भडका उडाला आहे. गुजरात सरकारकडून या भागात पाणी पोहोचल्याचा कितीही वल्गना केल्या असल्या तरी अब्दसा, नखत्राणा, लखपत आणि कांडला शहरामध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. रापरपासून नर्मदा कालव्याचे काम अर्धवटच आहे. 

अधिक वाचा : मध्य प्रदेशात २५० ईव्हीएममध्ये बिघाड; तक्रारी वाढल्या

बोटींग शेतकऱ्यांच्या मुळावर
पर्यटनाला चालना देण्यासाठी बोटींग व्यवस्था केली असल्याने पाण्याची पातळी कायम अत्यावश्यक आहे. त्यामुळे इंदिरा सागर सरदार सरोवरात वळविण्यात आले. आता याच प्रकल्पावर पंतप्रधान मोदींची मह्त्वांकाक्षा असलेला वॉटर एअरड्रोम गुजरात सरकारकडून करण्यात येणार आहे. वॉटर एअरड्रोमच्या निर्मितीनंतर सी-प्लेन लँडिंग आणि टेक ऑफ करू शकतात. त्यामुळे कच्छमध्ये आणखी भीषण पाणीसंकट ओढवू शकते. शेतकरी संघटनांनी याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 

नर्मदा कालव्यातून पाण्याची चोरी वाढली 
गुजरातमधून नर्मदा कालव्यातून पाणी चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. आतापर्यंत ३७ एफआयआर पाणी चोरीविरोधात नोंदविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली आहे. कच्छमध्ये चालू वर्षात फक्त २६.२१ टक्के पाऊस पडला आहे.  

Post a Comment

 
Top