एका दिव्यांग तरुणीसोबत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकार्यांनी गैरवर्तन केलेल्याचे समोर आले आहे. सीआयएसएफ महिला आधिकार्यांवर व्हीलचेअरवरून जबरदस्तीने उठवून तिची चेकिंग केल्याचा आरोप दिव्यांग तरुणीने केला आहे.
या प्रकरणी केंद्रीय उड्डयन राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनी तक्रारकदार दिव्यांग तरुणीची माफी मागितली आहे. जयंत सिन्हा यांनी सीआयएसएफकडे स्पष्टीकरणही मागितले आहे. दुसरीकडे, सीआयएसएफने दिव्यांग महिलेचे आरोप फेटाळले आहेत. महिलेची तपासणीही नियमानुसार केल्याचे सीआयएसएफच्या सूत्रांनी म्हटले आहे.
विराली मोदी (27) असे आरोप करणार्या तरुणीचे नाव आहे. विरालीने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. ती दिव्यांग असूनही एअरपोर्टवर तिच्यासोबत अधिकार्यांकडून गैरवर्तन करण्यात आले. विराली ही दिव्यांग महिलांसाठी कार्यरत आहे.
Post a Comment