0
ठळक मुद्देदुकानातील तिजोरी फोडण्याचा केला चोरट्यांनी प्रयत्न 
पुणे : वडगाव शेरी रिलायन्स मॉलजवळ असणाऱ्या कराडकर नगरीतील पार्श्व ज्वेलर्स सोनाराच्या दुकानावर शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानातील ४ तोळे सोने व १० किलो चांदी असा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे दागिन्यांची चोरट्यांनी चोरीकेली. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. दुकानाच्या समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने दुकानाचे शटर अर्धवट उघडे असलेची माहिती मालक चेतन ओसवाल यांना फोन करून दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या समोर राहणाऱ्या व्यक्तीने दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती मालक चेतन ओसवाल यांना फोनवरुन दिली. त्यांना दुकानात आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यात चोरांनी दुकानाचे शटर उचकटून आतमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सेफरूमच्या दरवाजाचे लॅच तोडत सोन्या चांदीच्या दागिने लंपास केले. दुकानातील मुख्य तिजोरी फोडण्याचा चोरांनी प्रयत्न देखील केल्याचा प्रकार दिसून आला. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील चोरी केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी गुन्हे शाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेटि देऊन तपासाच्या सूचना दिल्या.अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत
theft of 4.5 lakhs jewellery in shop at Wadgaon Sheri | वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास 

Post a Comment

 
Top