0
डुंगरपूर- एका काँग्रेस नेत्यावर गावकर्‍यांची नाक घासून माफी मागण्याची वेळ आली. नेत्याने अशी चूक केली होती की, गावकर्‍यांनी 2 किलोमीटरपर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना पकडले. विशेष म्हणजे जमिनीवर नाक घासून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. ही घटना राजस्थानात घडली.
डुंगरपूरमधील सागवाडामध्ये काँग्रेस नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष भगवतीलाल रोत हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या सभेला निघाले होते. झोसावा गावाजवळ भगवतीलाल यांच्या गाडीमुळे काही गावकऱ्यांच्या अंगावर चिखल उडाला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. गावकर्‍यांनी भगवतीलाल यांच्या गाडीचा पाठलाग करून वाटेत अडवले. त्यांना नाक घासून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. काही गावकर्‍यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.Congress leader apologizes for their mistake in rajasthan at Assembly Election

Post a Comment

 
Top