0
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इथे बुधवारी मध्यरात्री एका चायनीजच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आग विझवताना अग्निशमन दलातील जगन आंबवले यांचा मृत्यू झाला तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
बुधवारी मध्यरात्री 1.10 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील विद्युत पुरवठाही काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत असून जगन आंबवले यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Post a Comment

 
Top