0
  • Ajit Pawar to be arrested at any time: State President Raosaheb Danve claimsमुंबई - सिंचन घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.मात्र, त्यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अजित पवारांची या घोटाळ्यात काहीच भूमिका नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उगाच वावड्या उठवत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

    १९९९ ते २०१४ या कालखंडादरम्यान आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे जलसिंचन मंत्री होते. या काळात ७२ हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पवारांच्या दारावर कधीही पोलिस येऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेतची टांगती तलवार आहे, असे वक्तव्य दानवेंनी केले. या प्रकरणात अजित पवारांची काहीच भूमिका नसल्याचे ४ वर्षांपूर्वीच सिद्ध झालेले आहे. परंतु, भाजप आपल्या फायद्यासाठी या अफवा उडवत आहे, मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

 
Top