0
सैन्य दलात विजयाचा इतिहास असणाऱया व शत्रूला नेहमीच पाणी पाजवून, नेहमी विजयी होणारी, मराठा बटालियन ही देशाची व भारतीय सैन्य दलाची एक शान असल्याचा गर्व आहे. भविष्यात येणाऱया आव्हानाला  सक्षम तोंड देण्याबरोबर, शत्रूंचा खात्मा करण्यासाटी, बहाद्दूर मराठा बटालियन सक्षम  आहे. यामुळेच मराठा बटालियन हे नेहमीच विजयी ठरत असल्याचे गौरवोद्गार भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.
बुधवारी सैन्यदलाच्या कोल्हापूरातील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआयतर्फे आयोजित, एक दिवशीय माजी सैनिकांचा मेळावा टेंबलाईंवाडी येथील मिलिटरी स्टेशनमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रावत यांच्या हस्ते, 20 वीरनारी, वीरमाता यांचा सत्कार तसेच दिव्यांगांना दुचाकी वाहन प्रदान करण्याचा कार्यक्रम ही यावेळी झाला. तसेच या परिसरात उभारलेल्या, माजी सैनिकांच्या विविध योजनांच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली.. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार श्रीमंत संभाजीराजे युवराज, खासदार धनंजय महाडीक, मराठा लाईट इन्फंट्रीचे जनरल पीजीएस पन्नू, ब्रिगेडीयर संजीव तिवारी,   सौ.मधुनिका रावत,कर्नल (नि.) विजयसिंह गायकवाड, सुभेदार एन.एन. पाटील आदी सैन्यदलातील आजी-माजी अधिकारी 5 हजार माजी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

 
Top