0
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्याच्या विविध भागात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुरु केलेले आंदोलन त्यांच्या रास्त व प्रलंबीत मागण्या मान्य करुन या प्राध्यापकांनी सुरु केलेला संप व काम बंद आंदोलन त्वरित मागे घेतले जावे, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनाची प्रत नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांच्याकडे देवून आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली आहे. संपूर्ण राज्यभर विविध महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या मागण्यांसाठी दि. 25 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलनाद्वारे संपावर असल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत असल्याचे या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत 25 सप्टेंबरपासून प्राध्यापक संपावर असल्याने अद्याप अभ्यासक्रम मोठय़ा प्रमाणात शिकविणे बाकी आहे. मात्र प्राध्यापकांच्या संपामुळे हे काम थांबले आहे. मात्र  2018 मध्ये या विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जावे लागणार असतानाही संपामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नसताना परीक्षांना सामोरे गेल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अन्यथा आंदोलन करणार
शासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालुन प्राध्यापकांच्या रास्त व प्रलंबीत मागण्या पूर्ण करुन संप मागे घेण्यास सूचवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आगामी 2 दिवसात हा संप मागे घेवून प्राध्यापक मंडळी महाविद्यालयात रुजू झाली नाही तर विद्यार्थ्यांना रस्त्यवर उतरुन आंदोलन करावे, लागणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
50 विद्यार्थी दाखल
नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना निवेदन देण्यासाठी सुमारे 50 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी, तहसील कार्यालयात दाखल झाले.  त्यामध्ये ऋषीकेश लाळगे, रोहित कर्चे, महेश माने, हणमंत खिलारे, शुभम तांबे, प्रणाली कर्णे, प्रतिक्षा सपकाळ, अक्षय टेंबरे, दिग्वीजय शिर्के आदींचा समावेश होता.

Post a Comment

 
Top