0
विश्वास दाखवून कोटय़वधी रुपयांची तयार करण्यात आलेली काजू मुंबईच्या दोन व्यापाऱयांनी खरेदी केली. मात्र, त्यानंतर ते दोघेही परतले नाहीत. त्यामुळे त्या दोघांनी काजू क्यापाऱयांना गंडविल्याचे उघडकीस आले आहे. या खळबळजनक घटनेनंतर त्या दोन व्यापाऱयांच्या विरोधात बेळगाव पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सोमनाथ परशुराम मजुकर (वय 31, रा. सोनोली) या काजू उद्योजकाने ही फिर्याद दिली आहे. एकूण दीड कोटी रुपयांची ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी सोमनाथ यांची 25 लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर अमित आणि सुमित यांनी तीनवेळा 24 लाख 91 हजार 250 रुपयांची तयार काजूची पाकिटे त्या व्यापाऱयांना पाठवून दिली आहेत. त्या व्यापाऱयांनी त्यांना धनादेश दिला होता. मात्र तो धनादेश वठला नाही. त्यामुळे ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या काही प्रकरणे उघडकीस आली असली तरी बेळगाव, चंदगड, खानापूर या तालुक्मयातील अनेकांनी त्या दोघा व्यापाऱयांना काजू दिली आहे. त्यामुळे त्या सर्वांनाही फसविल्याचा अंदाज असून आता पुन्हा फिर्याद दाखल होण्याची शक्मयता आहे. सध्या काजू उत्पादक व उद्योजक त्या व्यापाऱयांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याचे दिसून येत आहे. सध्या दीड कोटी रुपयांच्या घरात ही रक्कम असली तरी हा आकडा वाढणार आहे.

Post a Comment

 
Top