मियामी - अमेरिकेत एक प्रेग्नेंट महिला डॉक्टरकडे रुटीन चेकअपसाठी गेली होती. तिचे अल्ट्रासाऊंड करण्यात आले तेव्हा मुलाच्या तोंडातून बुडबुडे निघताना दिसले. डॉक्टरांनी म्हटले की, मुलाच्या शरिरात ट्युमर असल्याने अबॉर्शन करावे लागले. पण महिलेला बाळ हवे होते. तिने सेकंड ओपिनियन घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टरांनी गर्भाशयातच मुलाच्या सर्जरीचा पर्याय सांगितला. पण त्याआधी कोणत्याही बाळावर अशी सर्जरी करण्यात आली नव्हती. तरीही बाळाला वाचवण्यासाठी महिला ते करायला तयार झाली. डॉक्टरांनी अशाप्रकारची पहिली सर्जरी केली आणि ती यशस्वी ठरली. यामुळे महिला आणि बाळाचा जीव तर वाचलाच पण जगाला एक अनोखी भेटही मिळाली.
डॉक्टरांनी दिली वाईट बातमी
- मियामीच्या टॅमी गोनालेज या मुलीच्या स्वागताची तयारी करत होत्या. पण बाळाला ट्युमर असल्याने अबॉर्शन करावे लागेल हे समजल्यानंतर सगळीकडे दुःख पसरले.
- डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले तर बाळाच्या तोंडातून बुडबुडे निघताना दिसले. डॉक्टर म्हणाले की, हे टेराटोमा (ट्यूमर) मुळे होत असून हा ट्युमर वेगाने वाढतो.
- मिसकॅरेजची भिती असल्याने डॉक्टरांनी अबॉर्शनचा सल्ला दिला. बाळाचा जन्म झाला तरी त्याला अनेक सर्जरींना सामोरे जावे लागेल असे डॉक्टर म्हणाले.
- टॅमीच्या प्रेग्नंसीला 17 आठवडे झालेले होते. तिला बाळ गमवायचे नव्हते. तिने सेकंड ओपिनियन घेतले.
- डॉक्टरांनी तिला इंडोस्कोपी सर्जरीद्वारे लेझरद्वारे हा ट्युमर काढता येईल असे सांगितले. तेही हे सर्व गर्भाशयात करता येणार होते.
- अद्याप अशी सर्जरी कोणावरही करण्यात आली नव्हती. पण टॅमी या प्रोसिजरसाठीही राजी झाली. कारण तिला कोणत्याही परिस्थितीत मुलगी गमावायची नव्हती.यशस्वी ठरली शस्त्रक्रिया
- मियामीच्या जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलच्या फेटल थेरेपी सेंटरमध्ये डायरेक्टर रुबेन यांनी टॅमीच्या गर्भाशयात प्रथमच अशी इंडोस्कोपी सर्जरी केली.
- सर्जिकल टूल्सपासून ते लहान कॅमेऱ्यासह सर्वकाही एका इंचापेक्षा लहान जागेतून गर्भाशयात टाकले आणि ट्यूमर कापला.
- टॅमी स्वतःदेखिल ही संपूर्ण शस्त्रक्रिया पाहत होती.जगाला मिळाली अनोखी भेट
- या प्रोसिजरच्या चार महिन्यांनंतर टॅमीने मुलीला जन्म दिला. बाळ पूर्णपणे निरोगी आणि इतर मुलांप्रमाणेच सुदृढ होते. पण सर्जरीमुळे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रण होते.
- या सर्जरीमुळे टॅमीला तिची मुलगी मिळाली तर जगात प्रथमच इंडोस्कोपी सर्जरीद्वारे फेटल ओरल टेराटोमा हटवण्यात आला.
- या केसबाबत अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्सटेट्रिक अँड गायनॅकोलॉजीपासून ते जगभरातील मीडिया हाऊसेसच्या रिपोर्टमध्ये पब्लिश करण्यात आले होते. पण डॉ. रुबेन यांना सुमारे 2 वर्षांनी या कामासाठी ओळखले जाऊ लागले.-
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment