0
  • Maratha reservation:The final decision on the percentage of the resarvationमुंबई- अारक्षणाचे विधेयक विधिमंडळात मांडण्यास अवघे काही तास उरलेले असतानाही राज्य सरकार मराठा समाजाला किती टक्के अारक्षण द्यायचे याबाबत ठाेस निर्णय घेऊ शकलेले नाही.

    अारक्षणासाठी नेमलेल्या मंत्र्यांच्या उपसमितीची पाचवी बैठक बुधवारी रात्री मुंबईत झाली, त्यात गुरुवारी विधिमंडळात राज्य मागासवर्ग अायाेगाच्या शिफारशींचा दीडपानी कृती अहवाल (एटीअार) मांडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात अारक्षणाचे विधेयक मांडले जाईल. या विधेयकाच्या मसुद्यावरही उपसमितीची अंतिम चर्चा झाली. मात्र मराठा समाजाला नेमके किती टक्के अारक्षण द्यायचे याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
    गुरुवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू हाेण्यापूर्वी सकाळी उपसमितीची अाणखी एक बैठक हाेणार असून त्यात अारक्षणाच्या टक्केवारीचा अंतिम निर्णय हाेईल, असे उपसमितीचे सदस्य मंत्री गिरीश महाजन, एकनाथ शिंदे म्हणाले. अाघाडी सरकारने मराठा समाजाला १६ % अारक्षण दिले हाेतेे.

Post a Comment

 
Top