0
ठाणे ; मराठवाडा, विदर्भ, खानदेश, सांगली, सातारासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, माता-भगिनींची आजपासून पायी रॅली सुरू होणार आहे. आज पहाटे ४ वाजल्‍यापासून ८ वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरुन सुमारे आठ ते हा हजार मोर्चेकरी लोकलने ठाण्याकडे रवाना झाले. या मोर्चात ५० हजारहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश बारेला यांनी सांगितले.
दरम्‍यान, न्याय हक्कासाठी मोर्चेकर्‍यांनी भुसावळ-पुणे एक्सप्रेस रोखली. शेतक-यांना कबुल केलेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी, वनविधायक कायद्याची अंमलबजावणी करुन आदीवासींच्या नावावर जमिनी व्हाव्यात, यासह अनेक लोकाभिमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. 

Post a comment

 
Top