मुंबई- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतली आहे.
जयदेव आणि उद्धव यांच्यात संपत्तीवरून वाद उफाळून आला होता. हा वाद थेट मुंबई हायकोर्टातही गेला. जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मृत्युपत्राबाबत संशय व्यक्त करत थेट हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टात या खटल्याची सुनावणीही सुरु होती. मात्र, जयदेव यांनी याचिका मागे घेतली आहे.
बाळासाहेबांच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंकडेच
जयदेव ठाकरे यांनी सांगितले की, खटला आणखी पुढे नेण्याची इच्छ नाही. त्यामुळे याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली आहे.

Post a Comment