0
आपल्या मातृभाषेची जपणूक करणे,तिला वाढवणे आपले प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, असे उद्गार गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
येथील कोंकणी मासिक उजवाडच्या द्विदशकपूर्ती वर्धापन सोहळय़ात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. यावेळी कोंकणी लोकोत्सव-2018 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीचे अध्यक्ष आर. पी. नाईक होते.
खासदार सुरेश अंगडी, गोक्याचे कला आणि संस्कृती खात्याचे संचालक गुरूदास पिळणकर, बेळगाव धर्म प्रांताचे मौन्सिन्यूर लुसियो मस्करेन्हस, केंद्रीय साहित्य अकादमीचे कोकणी भाषा सल्लागार समितीचे समन्वयक, भूषण भावे, फादर ऑल्वीन सुधीर, एसबीओएफ प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर सावियो परेरा, उजवाडचे संपादक लुईस रॉड्रिग्स, आमदार अनिल बेनके, सोहळा समितीचे अध्यक्ष  गिरगोल रॉड्रिग्स, स्वागताध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, सचिव मिनिन गोन्साल्विस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मिवियन रॉड्रिग्स, प्रेमा रायकर आदींनी स्वागत गीत सादर केले. स्वागताध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर यांनी स्वागत भाषण केले. एम. बी. गोन्साल्विस यांनी प्रास्ताविक केले.
भूषण भावे यांनी पुढे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत कोंकणी भाषेचा इतिहास विषद केला. संपादक लुईस रॉड्रिग्स यांनी उजवाडच्या वाटचालीची माहिती दिली.
दुपारच्या सत्रात गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यातर्फे एलव्हीस गोवेस दिग्दर्शित केपेची किर्णा या बहारदार कोंकणी कार्यक्रमांतर्गत कोंकणी लोकगीते, कोंकणी नृत्य, नाटीका आदी कार्यक्रम झाले.
आल्फी मंतेरो- पुणे, जॉर्ज फर्नांडिस – कारवार, बाळकृष्ण पै – बेळगाव, ऑगस्टीन  परेरा – मुंबई, थॉमस फर्नांडिस – गोवा, सुवर्णा अणवेकर – बेळगाव, लजारियो पिंटो – मालवण यांना उजवाड कोंकणी गौरव आणि डॉ. डेव्हीस अल्वारिस – मुंबई, जॉन्सन डिसोजा – महाड, शांप्रास बारदेसकर – कोल्हापूर, महेश वेर्णेकर – बेळगाव, संतान डिसोजा – चंदगड, फ्रान्सिस सेरांव आदींना उजवाड कोंकणी अभिमान पुरस्काराने गौरविण्यात आले.

Post a Comment

 
Top