0
गोवा येथे  ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूमधडाक्‍यात सुरुवात झाली आहे. जगभरातल्या १६ नामांकीत चित्रपट महोत्सवांपैकी हा अतिशय महत्वाचा महोत्सव आहे. इफ्‍फी महोत्‍सवाचा आज चौथा दिवस आहे. आजच्‍या  दिवशी सकाळी ११. ४५ ला बॉलिवूड जगतात मायलस्‍टोन ठरलेला 'शोले' चित्रपट इफ्‍फीच्‍या ॲक्‍सेसेबल फिल्‍म विभागातून दादिग्‍दर्शक रमेश शिप्‍पी यांचा शोले चित्रपट १५ ऑगस्‍ट १९७५ मध्‍ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची पटकथा जावेद अक्‍तर आणि सलीम खान यांची आहे.  या चित्रपटाला हिंदी चित्रपट जगताला जय आणि विरुची जोडी दिली. या चित्रपटातील दमदार संवाद आजही प्रेक्षकांच्‍या मनावर आधिराज्‍य गाजवतात. या चित्रपटातील प्रत्‍येक पात्र प्रेक्षकांच्‍या मनात आजही ठसठसून भरलेले आहे. गब्‍बरचा थरार आणि बसंतीची बडबड इफ्‍फीच्‍या निमित्ताने पुन्‍हा अनुभवता येणार आहे.  खवला जाणार आहे. 

Post a comment

 
Top