0
शहरात कचराकोंडी झाल्यापासून मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. हिंसक कुत्र्यांच्या झुंडी अचानक हल्ला करून लहान मुले, नागरिकांना जखमी करत आहेत. बावीस दिवसांपूर्वी मामाकडे गेलेला दहावर्षीय चिमुकला कामावरून परतलेल्या वडिलांना भेटण्यासाठी जात होता. तेव्हा बारुदगर नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, संसर्ग वाढल्याने त्याला पुन्हा घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी दहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. नुरेमुज्जसम खालेद पिंजारी (रा. बारुदगर नाला) असे चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
रोज शंभरावर तक्रारी, पण पकडली जातात फक्त २० कुत्री पान. ५
दहा वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी तोडले लचके, संसर्ग वाढल्याने २२ दिवसांनंतर झाला मृत्यू २२ नोव्हेंबरपासून घाटी रुग्णालयात सुरू होते उपचार, कचऱ्याचे ढिगारे साठल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली स्थानिकांनी सांगितले, तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला परिसरातील काही स्थानिक नागरिक व कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार, नुरेमुज्जसमवर एकाच वेळी तीन कुत्र्यांनी हल्ला चढवत त्याचे लचके तोडले. डोळे, तोंड व पायावर चावा घेतला. त्यानंतर नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून लावल्यानंतर सिटी चौक परिसरात त्याच कुत्र्यांनी इतर तीन ते चार जणांना चावा घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तलक हायस्कूलमध्ये शिकत होता इयत्ता पाचवीत; आई गृहिणी-वडील हातगाडी चालक तलक हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारा नुरेमुज्जसम ५ नोव्हेंबर रोजी मामाकडे गेला होता. याच परिसरात तो आई-वडील व दोन लहान बहिणींसह राहत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मामाकडून तो वडील कामावरून परत आले असतील म्हणून त्यांना भेटण्यासाठी निघाला. तेव्हा एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येईपर्यंत त्या कुत्र्याने जबडा, डोळे, तोंडावर लचके तोडले होते. कुटुंबाने धाव घेत त्याला तत्काळ घाटीत दाखल केेले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार करून त्याला घरी पाठवले. परंतु २२ नोव्हेंबर रोजी त्याच्या शरीरातील संसर्ग वाढला. त्यामुळे त्याला पुन्हा घाटीत दाखल करण्यात आले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. परंतु संपूर्ण शरीरात संसर्ग पसरल्याने मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याचे वडील रंगार गल्लीत हातगाडीवरून किरकोळ सामान विकतात. त्याला दोन लहान बहिणी असून आई गृहिणी आहे.
५० हजार कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी १० जण शहरात आजघडीला ५० हजारांवर कुत्रे असण्याची शक्यता आहे. कुत्र्यांना मारता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडून शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यासाठी खासगी संस्था नियुक्त करण्यात आली असली तरी ५० हजार कुत्र्यांसाठी फक्त १० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या १० जणांची दोन पथके दररोज १८ ते २० कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतात.
तेव्हा का आले नाही असे म्हणत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नुरेमुज्जसमच्या कुटुंबीयांनी केला. सायंकाळी कुटुंबीयांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात धाव घेत नुरेमुज्जसमच्या मृत्यूस अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु अशा प्रकरणात गुन्हे दाखल होत नाहीत, तुम्ही पाच तारखेलाच यायला हवे होते, असे सांगून आम्हाला परत पाठवून दिल्याचे मुलाचे काका अस्लम यांनी सांगितले.
२०१० मध्ये श्वानदंशाने मुकुंदवाडीतील मुलाचा झाला होता मृत्यू श्वानदंशाने २०१० मध्ये अंबिकानगर, मुकुंदवाडी येथील योगेश मुनिमाने या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात तो उपचारासाठी गेला खरा, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्याला लस खरेदी करणे शक्य झाले नाही. परिणामी रेबीजची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर श्वानदंशाने मृत्यू होण्याचे हे दुसरे उदाहरण समोर आले आहे. श्वानदंशाच्या अनेक घटना शहरात झाल्या आहेत.
मनपाकडून एक लाखाची मदत? मृत मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर घोडेले यांनी केली आहे. याचा आकडा जाहीर करण्यात आला नसला तरी किमान १ लाख रुपये दिले जातील, असे सूत्रांनी म्हटले आहे. तातडीने ही मदत दिली जाईल. 
 

Post a Comment

 
Top