0
पुणे ;


आयटी पार्क म्हणुन ओळख असणाऱ्या चंदननगर भागात घरात शिरुन महिलवर अज्ञातांने गोळी झाडुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  पुण्यात सकाळच्या वेळीच असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडली आहे. एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी, इंद्रायनी गृह रचना या बहुमजली इमारतीत बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास  हा प्रकार घडला आहे. दरम्यान गोळीबारानंतर एकता यांना त्यांचे पती ब्रिजेश यांनीच रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू उपचारा आधीच झाला. त्यांच्या छातित गोळी झाडण्यात आली असुन, दोघानी गोळी झाडली असल्याचे सागंण्यात येत आहे, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे पतिनेच गोळी झाडल्याची चर्चा आहे. त्यामूळे पोलिस नेमकी गोळी कोणी झाडली याबाबत माहिती घेत आहेत. मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ मजली आहे..

Post a comment

 
Top