0

बाबासाहेब परीट, हिंमतराव पाटलांच्या कथांना रसिकांची भरभरून दाद  

 • औरंगाबादबशर नवाज सभागृह : अस्सल कोल्हापुरी बाजातील रांगड्या भाषेतील कथांनी कथाकथनाचे सत्र भरून पावले. प्रसिद्ध कथाकार बाबासाहेब परीट आणि हिंमतराव पाटील यांनी कार्यक्रमात रंगत आणली. दोघांच्याही कथांनी रसिक खळखळून हसले आणि भावविवशही झाले.
  पाटील यांनी कथेचा पूर्वेतिहास सांगितला.तर परीट म्हणाले, मोडलेल्या, दु:खात बुडालेल्या माणसाला उभं करण्याचे काम कथा करते. 'दिव्य मराठी' जळगावचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांनी सूत्रसंचालन केले.

  बाबासाहेब परीट यांची शिकारकथा
  परीट यांनी 'शिकार' नावाची कथा सादर केली. शंकऱ्या नावाचं एक इरसाल पात्र या कथेत आहे. उनाड असलेला शंकऱ्या कळत्या वयात आल्यापासून मटन खाण्यासाठी शिकारी करायचा. जवळपास सर्व प्राणी, पक्ष्यांच्या शिकारी केल्यानंतर त्याला आपण कधीच सशाची शिकार केली नसल्याचे आठवले आणि मध्यरात्री तो सशाची शिकार करायला गेला. नेम धरला, सशाच्या पार्श्वभागावर बंदुकीची गोळी लागली. ससा तसाच जखमी अवस्थेत तेथून पळाला. शंकऱ्याने रात्रभर त्या सशाची शोधाशोध केली, परंतु ससा सापडला नाही. उजाडल्यावर त्याने त्या जागेवर पडलेल्या रक्ताच्या अाधारे माग काढला. तेव्हा तो ससा एका झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता, त्याची चार-पाच डोळे न उघडलेली पिलं त्याचं दूध पिण्याचा प्रयत्न करीत होती.

  हिंमतरावांची कथा, माती... 
  पाटील यांच्या 'माती' नावाच्या कथेत इमली आणि रघू ही मुख्य पात्रे होती. आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर नवऱ्याला म्हणजे रघूला सोबत घेऊन इमलीला आजोबांच्या मातीला जायचं होतं. पण रघू येत नव्हता. तोे थोडाही विनोद झाला तरी खुदुखुदू हसणारा माणूस. मृताच्या ठिकाणी हसला म्हणून आधीच दोन-चार ठिकाणी मार खाल्लेला. पण तिथं मुक्काम करायचा नाही, ही अट त्यानं घातली होती. दु:खात बुडालेली आई, आजी, वडील आणि दुसरीकडे पती… शेवटी रघूच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर इमलीही रघूच्या मागे चालू लागली… 
  Babasaheb parit and Himmat rao patil in Divya Marathi Literature Festival

Post a comment

 
Top