0
देशातील सर्वात उंच तीन टप्यात कोसळणारा आणि आकर्षक धबधबा म्हणून जागतिक वारसास्थळ असणाऱया कास पुष्पपठारजवळ असलेला भांबवली वजराई धबधबा प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाला ‘क’ दर्जा प्राप्त झाला असून हा धबधबा सुमारे 1840 फुटावरून तीन टप्प्यात कोसळत आहे. जगविख्यात धबधब्याला सातारचे नूतन उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांनी भांबवली धबधब्याची बुधवारी भेट देऊन तेथील निसर्गरम्य वातावरणाची तसेच काही समस्यांची पाहणी केली.
 यावेळी यावेळी सहा. वनसंरक्षक परळकर, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व शितल राठोड, अमर शिंदे उपस्थित होते.
वनसमितील विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये
अलीकडे स्थानिकांच्या जमिनी बाहेरच्या लोकांनी विकत घेऊन नवीन पॉईंट विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशा काही गोष्टी होऊ नये आणि भांबवली वनसमितीला विचारात घेऊन निर्णय घ्यावे, असे निवेदन स्थानिकांनी उपवनसंरक्षक हाडा यांना दिले.

Post a Comment

 
Top