0
जिल्हयातील दुष्काळी तालुक्यातील गावांना तातडीने पिण्यासाठी टँकर सुरू करावे अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी जिल्हधिकारी यांच्याकडे निवेदनादवारे केली.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये  जिल्हयातील जत, कवठेमहाकांळसह काही तालुक्यातील गावांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लांबुनही पाणी मिळेनासे झाल्याने पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. लोकांबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. जत तालुक्यातील पांढरेवाडी, लकडेवाडी, सोन्याळ, आसंगी, पांडोझरी, जालिहाळ, उटगी, उमदी, येळवी, माडग्याळ, व्हसपेठ, आदीसह पन्नासहुन अधिक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
कवठेमहाकांळ तालुक्यातील घाटनांद्रेs, वाघोली, कुंडलापूर, अलकुड, रांजणी, यासही अन्य गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गावात टँकरची मागणीचे प्रस्ताव तहसिलदार यंना देण्यात आले आहेत. तातडीने टँकर सुरू करून नागरिक तसेच जनावरांना दिलासा दयावा असे पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. यावेळी राहुल गायकवाड, रविंद्र खराडे, सनी धोतरे, आयुब निशाणदार, शशिकांत देवते आदी उपस्थित होते.
 

Post a Comment

 
Top