0
  • मुंबई - मेट्रो, मोनो आणि जलद सेवांच्या निधीची आवश्यकता असल्याने सरकारने स्टॅम्प ड्यूटीत एक टक्का वाढ केली आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे सहा टक्के असणारी स्टॅम्प ड्यूटी सात टक्क्यांवर गेली आहे. तसेच मालमत्ता गहाण आणि दान देण्यासाठीही आकारण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्यूटीमध्येही वाढ करण्यात आली असल्याने मुंबईमध्ये घर खरेदी महागली आहे.

   सरकारने मुंबई महानगरपालिका अधिनियम दुसरी सुधारणा विधेयक क्रमांक ५९ मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मांडले. या अधिनियमात ही दुसऱ्यांदा सुधारणा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ सुरू असतानाच सुधारणा विधेयक मांडण्यात आले आणि ते गोंधळातच कोणतीही चर्चा न होता मंजूर करण्यात आले. दरम्यान, यंदाच्या घर खरेदी करताना वर्षी सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो.
  मुंबई - मेट्रो, मोनो आणि जलद सेवांच्या निधीची आवश्यकता असल्याने सरकारने स्टॅम्प ड्यूटीत एक टक्का वाढ केली आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे सहा टक्के असणारी स्टॅम्प ड्यूटी सात टक्क्यांवर गेली आहे. तसेच मालमत्ता गहाण आणि दान देण्यासाठीही आकारण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्यूटीमध्येही वाढ करण्यात आली असल्याने मुंबईमध्ये घर खरेदी महागली आहे.

  सरकारने मुंबई महानगरपालिका अधिनियम दुसरी सुधारणा विधेयक क्रमांक ५९ मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मांडले. या अधिनियमात ही दुसऱ्यांदा सुधारणा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ सुरू असतानाच सुधारणा विधेयक मांडण्यात आले आणि ते गोंधळातच कोणतीही चर्चा न होता मंजूर करण्यात आले. दरम्यान, यंदाच्या घर खरेदी करताना वर्षी सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो.
  News about Approval of the Bill in the Legislative Amendment Bill
News about Approval of the Bill in the Legislative Amendment Bill

Post a Comment

Top