0
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडवर सुरू असलेली कामे प्रगतीपथावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, असा विश्वास रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी रायगड दौऱ्याप्रसंगी  व्यक्त केला.
किल्ले रायगड आणि परिसरातील २१ गावांतील विकासकामांसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्यापकी केवळ १२० कोटी रुपये प्रत्यक्षात रायगड किल्ला संवर्धनाच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित निधी हा या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आलेल्या २१ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितकिल्ल्यावर जाणारा अनेक वर्षाचा पादचारी मार्ग गेल्या काही वर्षात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णपणे नादुरुस्त झाला होता गडावर या मार्गाने जाणाऱ्या शिवभाक्ताची संख्या आजही प्रतिवर्षी हजारोच्या पट्टी मध्ये असते हे लक्षात घेऊन रायगड प्राधिकरणाने चित्त दरवाजा या मुख्य मार्गासह नाणेदरवाजा मार्गाची दुरुस्ती सुरू केली असून या ठिकाणी प्राथमिक स्तरावर काम वेगात सुरु असल्याचे प्रत्यक्ष भेटी अंती निदर्शनात आले. पुरातत्वखाताच्या मार्गदर्शना खाली हि कामे सुरु असून कामाचा दर्जा तत्कालीन काळाशी निगडीत राहण्यासाठी विशेष पयत्न केले जात असल्याचे दिसून आले. 
उत्खनन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन कामासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. यातून उत्खनन, गडावरील कोअर एरिया, तटबंदी आणि मनोऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. शिर्काई मंदिर, व्याडेश्वर मंदिर, जगदीश्वर मंदिर या परिसरातील संवर्धनाची कामे पूर्ण झाली आहेत. संवर्धनासाठी ६०० कोटी मंजूर झाले असून त्यापैकी १२० कोटी रुपये रायगडवर तर उर्वरित रक्कम प्राधिकरणातील २१ गावांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार आहे. गडावरील ८४ पाण्याच्या टाक्यांपकी २१ टाक्यांतील, त्याचप्रमाणे कुशावर्त तलाव आणि हत्ती तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्या टाक्यांमधील गाळ साफ करण्यात आला आहे, त्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य झाले आहे. गाळ काढण्यात आल्याने या सर्व ठिकाणांवरील पाणी साठवण क्षमतादेखील वाढली आहे. चित्तदरवाजा, कुशावर्त तलाव परिसर, हत्ती तलाव, शिवकालीन नालेव्यवस्था, शिर्काई मंदिर, नाना दरवाजा या भागात पूर्ण झालेली आणि सुरू असल्याचे आढळून आले. पाचाड परिसरात 88 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसृष्टी, युद्ध संग्रहालय, शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभे करण्याचा खासदार संभाजीराजे याचा आपला मानस पहाता भविष्यामध्ये हि वास्तू सर्व शिवभक्ताकरिता मार्गदर्शक ठरेल.
किल्ले रायगड परिसरातील जी २१ गावे रायगड प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रितनिधी याची या विकासात्मक कामात महत्व पूर्णजबाबदारी राहणार आहे एकूणच छत्रपती शिवरायाच्या या राजधानीला पुर्नवैभवाकडे नेहण्याची वाटचाल आगामी काळात अधिक वेग घेईल असे दिसून येत आहे. रायगडावर सुरु असलेल्या या विविध विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षभरात गडाला भेट देणाऱ्या शिवभक्ताच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकदारांकडून देण्यात आली आहे. या विविध कामामुळे परिसरातील शेकडो बेरोजगारांना प्रतिमाह १५ ते २० हजारापर्यंत वेतन मिळत असल्याने या वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात वाढत जाणारी कामे पाहता परिसरातील २१ गावातील हजारो बेरोजगार तरुण रोजगभिमुख व व्यवसायाभिमुख होईल असा विश्‍वास या कामामुळे स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षापूर्वी रायगड प्राधिकरणची घोषणा झाल्यानंतर गडावरील प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम मागील वर्षी सुरू झाले. गडावरील ऐतिहासिक पुरातन ठेवा त्याच पद्धतीने जतन करण्याकरिता झालेली घोषणाही देशातील शिवभक्तसाठी उत्सुकता वाढविणारी ठरली आहे.

Post a comment

 
Top