0
कऱ्हाड : केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक केलेली आहेत. तसेच जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार हे फसवणीस सरकार आहे, अशी टीका करीत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी भाजप विरोधात जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधासन आंदोलन केले.

येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दुपारी अकरा वाजल्यापासून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश जगताप, जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष अमित जाधव, दक्षिण उपाध्यक्ष समीर पटवेकर, पाटण तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, दादासाहेब काळे, अजित भोसले, जितेंद्र यादव आदींसह जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर निषेधासन आंदोलन करण्यात आले.

The protest against the BJP in Karhad, the Fadnavis government, the government of the fraud | कऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलन, फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार

Post a Comment

 
Top