सध्या सर्वत्र दिवाळी उत्सव मोठय़ा उत्साहात सुरू आहे. मात्र, समाजाच्या नजरेत दुर्लक्षित असणाऱया कातकरी वस्तीतील मुलांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने हिरवाईतर्फे यंदाही या मुलांना कपडे, पुस्तके आणि इतर उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हिरवाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या चौगुले, अरूण गोडबोले, अभिनेते किरण माने, विजय निंबाळकर, चित्रकार सागर गायकवाड, पत्रकार श्रीकांत कात्रे, आयुक्त चंद्रकांत दळवी, मधू फलले, डॉ. सोमनाथ साबळे, मिलींद हळबे, दादासाहेब चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हिरवाई संस्थेच्या वतीने फराळ व इतर साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. इतर दिवशी झाडांनी नटलेली हिरावाई सोमवारी मात्र मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेली होती. याप्रसंगी मुलांनी संपूर्ण हिरावाईमध्ये रांगोळी काढून परिसर सुंदर बनवला होता. अभिनेते किरण माने म्हणाले, यावर्षीची दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय असून या मुलांसोबत दिवाळी साजरी करणे हे मी माझे भाग्यच समजतो. ही भाग्यकारक संधी मला संध्या चौगुले यांच्यामुळे मिळाली. चौगुले यांचे सामाजिक कार्य केवळ प्रेरणादायी नसून सामाजिकदृष्या खूप महत्त्वाचे आहे.
डॉ. साबळे म्हणाले, चौगुले मॅडम यांचे कार्य खूप मोठे असून त्यांच्या या कार्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच गरीब-श्रीमंत ही दरी कमी व्हायला हवी, जणे करून समाजाचा विकास होईल. यावेळी विजय निबांळकर, यमुना ढेकणे, तानाजी मस्के, श्रीमती बुरंगुले, धावडशीचे सरपंच मंदाकिनी पवार, ऍड. वर्षा देशपांडे व तरुण भारतचे विशाल कदम यांचा सत्कार करण्यात आ
ला.

Post a Comment