0


दीपवीरनी आलेल्या सर्व पाहुण्यांना खास भेट दिलीय. त्यामुळे त्यांचे सगळे गेस्ट खूप खूश झालेत.                                                     मुंबई, : रणवीर- दीपिकाचं लग्न जोरदार झालं. सगळे फोटोही व्हायरल झाले. दीपवीरनं लग्नात तर काही भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. पण त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना खास भेट दिलीय. त्यामुळे त्यांचे सगळे गेस्ट खूप खूश झालेत.


ही भेटवस्तू आहे काय? तर दोघांनी त्यांचा एक सुंदर फोटो सगळ्यांना गिफ्ट दिला. हा फोटो चांदीच्या फ्रेममध्ये आहे. त्याखाली धन्यवादही लिहिलंय. दीपवीरच्या सुंदर क्षणांचे साक्षीदार झाल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानलेत. पाहुण्यांसाठीही ही भेट मौल्यवान अशी आहे.

Post a comment

 
Top