दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांच्या शाही लग्नसोहळ्यानंतर आता बॉलिवूडला वेध लागले आहेत ते देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनसच्या लग्नाचे. निक व प्रियांका येत्या या महिन्या अखेरीस लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी निक गुरुवारी हिंदुस्थानात दाखल झाला आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्या दोघांचा एक सुंदर फोटो शेअर केला असून त्यासोबत ‘वेलकम होम बेबी’ अशी प्रियांका आणि निक हे जोधपूरमधील मेहरान गडावर लग्नबंधनात अडकणार आहे. 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान हा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दिल्ली व मुंबईमध्ये लग्नाचे रिसेप्शन पार पडणार असून त्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आली आहेत.कॅप्शन शेअर केली आहे.
.

Post a Comment