0
  • चंदीगड - पंजाबच्या मोगा शहरात एका नाल्यामध्ये स्त्री अर्भक सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले. यानंतर तिच्या चौकशीमध्ये आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असताना त्या महिलेने संपूर्ण हकीगत मांडत आपल्या कृत्याची कबुली दिली. ती एक विवाहिता होती आणि पतीपासून दूर राहताना तिचे एका युवकासोबत अवैध शारीरिक संबंध जुळले होते. पोलिसांनी तिच्यासह आणखी एकाला अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे.


   पंचायतीच्या आदेशावर दूर गेले पती-पत्नी
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा जिल्ह्यातील बाघापुराना गावात राहणाऱ्या अमनदीप कौर (28) हिचा विवाह राजपाल सिंग उर्फ राजूसोबत झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. कुटुंबाने पंचायतीकडे तक्रार केली असता पंचांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर राहण्याचे आदेश दिले. गेल्या 2 वर्षांपासून अमनदीप कौर आपल्या पतीपासून दूर माहेरी राहत होती.

   मोबाईलवर झाली दुसऱ्याशी मैत्री
   पतीपासून दूर माहेरी आल्यानंतर अमनदीप एकटी पडली होती. याच दरम्यान अवघ्या 6 महिन्यांत ती जतिंदर नावाच्या एका युवकाच्या संपर्कात आली. घरापासून अगदी जवळ राहणाऱ्या जतिंदरचे आणि अमनदीप यांचे रोजच फोनवर चॅटिंग आणि बोलणे सुरू झाले. याच दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून अमनदीपला गर्भधारणा झाली. परंतु, जतिंदर आधीच विवाहित होता. सोबतच त्याला एक मुलगा देखील होता. सुरुवातीला त्याने अमनदीपच्या पोटातील बाळ स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, चर्चेनंतर दोघांमध्ये एक डील झाली.

   मुलगा झाला तर ठेवू अन्यथा फेकून देऊ...
   जतिंदरने बाळ स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा अमनदीपने वारंवार जतिंदरवर दबाव टाकला. यानंतर दोघांमध्ये चर्चेतून एक डील झाली. त्यानुसार, मुलगा जन्माला आल्यास सोबत ठेवू आणि मुलगी जन्मल्यास एखाद्या नाल्यात फेकू असे ठरले. याच दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी अमनदीपने एका मुलीला जन्म दिला. डीलनुसार, दोघांनी त्या मुलीला गावापासून काही अंतरावर एका नाल्यात फेकले. कित्येक तास पाण्यात राहून त्या नवजात अर्भकाचा जीव गेला.

   गेल्या 2 वर्षांपासून ती माहेरी राहात होती. याच दरम्यान तिचे अफेअर सुरू झाले.

   • Married woman and her lover throw away their baby girl after extramarital affair in punjab arrested

Post a Comment

 
Top