गेड सेपरेटच्या कामामुळे पोवईनाका ते शाहू चौक असे खोदकाम करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण रस्ता अरूंद झाल्याने नागरिकांसह वाहनधारक जीवमुठीत घेवून प्रवास करताना दिसत आहेत. तसेच या ठिकाणच्या ‘लॉ कॉलेज’ समोरील फुटपाथवर दुचाकी पार्किंगच्या रांगाच-रांगा लागल्याने पादचाऱयांना रस्त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या शहरात गेड सेपरटरचे काम वेगाने सुरू असून शहरातील वाहतूक व्यवस्थेत वारंवार बदल होत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला असून जागा दिसेल त्या ठिकाणी वाहनांचे पार्किंग केली जात आहे, अशीच परिस्थिती लॉ कॉलेज समोर निर्माण झाली असून कॉलेज लगतच वाहन पार्किंग करण्यात आली आहे. कॉलेज समोरील शाहू चौक हा रस्ता खोदकामुळे अरूंद झाला आहे. या रस्त्याने दुचाकी-चारचाकी वाहनांची मोठी वाहतूक सुरू असून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या परिसरात कॉलेज, शाळा असल्याने वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असते. मात्र, पादचाऱयांना चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्था केली असून त्यावरती देखील वाहनांची पार्किंग होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता गंभीर होत चालल्याने नागरिकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
लॉ कॉलेज समोरील रस्त्यावर पालिकेने हजारो रुपये खर्च करून फुटपाथ बनविला आहे. मात्र, या कामामुळे हा फुटपाथ दुचाकी वाहनधारकांसाठी पार्किंग पाईंट बनला आहे. या फुटपाथवर दुचाकी वाहनांच्या रांगाच-रांगा ला
गल्याचे चित्र आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनाही होताना दिसू लागला आहे.

Post a Comment