0
ठळक मुद्देकाजळेश्वर येथे घेण्यात आलेल्या सामुदायिक प्रार्थनेवेळी गावातून प्रथम संध्या फेरी काढण्यात आली.पाच तरुणांनी व पाच ज्येष्ठ लोकांनी दररोज नित्यनियम सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प घेतला.
अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत. बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी ग्रामगीता विचार युवा मंच अकोलाद्वारा जिल्ह्यातील सातवी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर या गावी उत्साहात पार पडली.
काजळेश्वर येथे घेण्यात आलेल्या सामुदायिक प्रार्थनेवेळी गावातून प्रथम संध्या फेरी काढण्यात आली. यामधे ‘चला चला चला सामुदायिक प्रार्थनेला चला’ असा जयघोष करण्यात आला. त्या नंतर सामुदायिक प्रार्थना पार पडली. प्रस्ताविक प्रा. शुभम पांडुरंग वरणकार यांनी केले व आर.आय. शेख गुरुजी, सचिन महल्ले, मुकेश वाकोडे, रामजी उपाध्याय यांनी गावकरी लोकांना मार्गदर्शन केले व नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू ठेवण्याचे आवाहान केले. नंतर काजळेश्वर गावातील पाच तरुणांनी व पाच ज्येष्ठ लोकांनी दररोज नित्यनियम सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प घेतला. समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाची तयारी केली. कार्यक्रमाला आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अशोक रत्नपारखी, दीपक लुले गुरुजी, प्रदीप गिरे, कळम दादा, वासुदेव माजरे, महादेव जानकर, विजय भिसे, ग्रामगीता विचार युवा मंचचे प्रा. शुभम वरणकार (जिल्हा समन्वयक), डॉ. राम उपाध्याय, मुकेश वाकोडे, मोहन लुले, कुलदीप हरणे, ओम उपाध्याय व सर्व गुरुदेव सेवक व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. शुभम वरणकार यांनी केले
Community prayer of Rashtrsanta in 50 villages of Akola district | अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना

Post a comment

 
Top