सुतळी बॉम्ब तोंडात फुटल्याने एका सात वषीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिह्यात घडली आहे. पिंपळगाव सराई इथे मंगळवारी हा प्रकार घडला. यश संजय गवते असे मृत मुलाचे नाव आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यश त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर फटाके फोडत होता. खेळता खेळता यश घरात आला आणि काडीपेटीचा डब्बा घेऊन बाहेर गेला. त्यावेळी त्याचे वडील जेवत होते. अचानक काही वेळाने स्फाटाचा आवाज आला. त्याच्या वडिलांनी बाहेर जाऊन पाहिले असता, यश रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. खेळताना यशला सुतळी बॉम्ब सापडला. यशने तो बॉम्ब फोडण्यासाठी विस्तवासमोर ठेवला. पण बॉम्ब फुटलाच नाही. मग यशने सुतळी बॉम्ब पुन्हा हातात घेतला. सुतळी बॉम्बची वात तोंडात धरत असतानाच तो फुटल्याने यशला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. परंतु त्या
आधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Post a Comment