0

पुढील ५० वर्षांचा विचार करून एल अ‍ॅण्ड टी कंपनीला सार्वजनिक सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम दिले होते.

 ठळक मुद्दे

वीन मेट्रो मार्ग : कार्यक्षेत्रातील ७७ लाख लोकांना मिळणार सुविधा सन २०३८ पर्यंत मेट्रोचे दोन टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन 

पुणे  महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रातील सर्वकष वाहतूक आराखडाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विविध मार्ग, रिंगरोड, या रिंगरोडवरील नगर रचना योजनेतील १४ टीपी स्कीम आणि या कायक्षेत्रातील जवळपास ७७ लाख लोकसंख्येसाठी पुढील ५० वर्षांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत बृहत आराखडा तयार करण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीला दिले होते. त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात येत्या मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी १२ वाजता हे सादरीकरण होणार आहे. गित्ते म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, खराडी, उरूळी कांचन, रांजणगाव गणपती, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, पिरंगुट, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच जेजुरी आदी विविध भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि आयटी पार्क उदयास आले आहे. या परिसराचा वेगाने विकास होत असून, औद्योगिक तसेच निवासी क्षेत्र याठिकाणी वाढले आहे. या कार्यक्षेत्रात जवळपास ७७ लाख ५० हजार लोक राहतात. त्यांना उत्तम सुविधा निर्माण करणे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए या तिन्ही संस्थांपुढे मोठे आव्हान आहे. 
पुढील ५० वर्षांचा विचार करून एल अ‍ॅण्ड टी कंपनीला सार्वजनिक सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. सन २०३८ पर्यंत मेट्रोचे दोन टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्याच्या महामेट्रो कंपनीच्या वतीने कात्रज ते निगडी आणि वारजे ते चंदननगर या मागार्चे काम सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील वाघोली ते हिंजवडी, चांदणी चौक ते हिंजवडी, खडकवासला ते पुणे कॅन्टोमेन्ट हद्द आणि हिंजवडी ते चाकण या मार्गांचे नियोजन पुढील काळात करण्यात येणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले. 
PMRDA to launch a comprehensive traffic plan | पीएमआरडीएचा सर्वकष वाहतूक आराखडा होणार सादर

Post a Comment

 
Top