पुणे- पुण्याच्या संगमवाडी पुलाजवळील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. झोपडपट्टीच्या गल्ली क्रमांक 3 मध्ये ही आग भडकली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुण्यात बुधवारी आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. झोपडपट्टीला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment