नांदेड - उमरी तालुक्यातील तुराटी गावात भाऊबिजेला पोतन्ना रामन्ना बलपिलवाड (६५) या शेतकऱ्याने शेतात स्वत:च सरण रचून धगधगत्या चितेवर उडी घेत आत्महत्या केली. कर्जाचा बोजा व दुष्काळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. पोतन्ना यांना ७ एकर कोरडवाहू जमीन होती. पत्नी, १ मुलगा, ५ मुली असे त्याचे कुटुंब होते. सातत्याने पडणारा दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे ते विवंचनेत होते. दिवाळीही साजरा करता न आल्याच्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले.
कर्जमाफीत नाव नाही : पोतन्ना यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्जमाफीच्या निकषात ते बसले नाही. त्यांनी शुक्रवारी रात्री शेतात चिता रचून ती पेटवली व धगधगत्या चिताग्नीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले.२.७९ लाखांचे होते कर्ज : या घटनेनंतर उमरीचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोतन्ना यांच्या नावे सात एकर जमीन असून त्यांच्या सातबारावर २ लाख ७९ हजारांचे बँकेचे कर्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे जी मदत दिली जाते ती तातडीने दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment