0
ठळक मुद्देवाहतूक शाखेच्या पोलिसांची एका दिवसात कारवाई
कोल्हापूर : शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असलेची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गुजर यांच्या निदर्शनास आले होते.
त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि. २०) दिवसभरात कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, शिवाजी पुतळा, रंकाळा टॉवर, संभाजीनगर, सायबर चौक, कसबा बावडा, आदी परिसरांत वाहन तपासणी मोहीम राबविली. यावेळी झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट,‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’ यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहित नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन निरीक्षक गुजर यांनी केले आहे.

कारवाई टप्पा (कंसात आकडेवारी)
रहदारीस अडथळा (११८), वाहन परवाना नसणे (१८), तिब्बल सीट (४४), मोबाईल वापरणे (४०), नियमात नंबर प्लेट नसणे (९), प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे (२७), सिग्नल तोडणे (१७), विरोधी दिशेने वाहन चालविणे (३), ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह (१), इतर (१२).
सीसीटीव्ही कारवाई
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. नियमबाह्य वाहने चालविणाºया वाहनधारकांना कॅमेºयात टिपून त्यांचे छायाचित्रासह नोटीस घरपोहच पाठविली जाते. अशा ६९ नोटीसा निकाली काढल्या आहेत. आणखी १०१ नोटीस तयार आहेत. लवकरच त्या संबधीतांना पाठविल्या जाणार आहेत. १० वाहन चालविणेचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागास (आर. टी.ओ) सादर केला आहे, अशी माहिती निरीक्षक गुजर यांनी दिली.
Recovery of fine of Rs. 59 thousand in one day | एका दिवसात वसूल केली ५९ हजार रुपये दंडाची वसुली

Post a comment

 
Top