0
शहराचा होणारा विकास आणि वाढती लोकसंख्या व बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. याच पार्श्वभूमीवर बारामतीत वाहतूक शाखा सुरु केली. दोन महिन्यात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर प्रत्येक कारवाईत शंभरी पूर्ण करून दंडात्मक कारवाई केली आहे.    
देशातील एक आदर्श शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. साहजिकच यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान आहे. जिल्हा स्थरावर असणाऱया सर्व सोयीसुविधा बारामतीत उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र, बेशिस्त वाहन चालकांमुळे  शहरात व तालुक्यात वाहतूक कोंडी कायम होत असे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारताच स्वतंत्र वाहतूक शाखा सुरु केली. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईत वाढ झाली आहे.
त्यामुळे शहरांतील रोडरोमिओ, बेशिस्त वाहन चालक, ड्रिंक ड्रायव्ह अशा विविध कारवाई करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. यामध्ये वाहतूक शाखेचे मनुष्यबळ पोलीस निरीक्षक 01, पोलीस कर्मचारी 15, ट्राफिक वार्डन 30 असे आहे. तसेच ट्राफिक वार्डन देणे गरजेचे असून वाहतूक व्यवस्था ही समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मात्र, सिग्नल कार्यान्वित करणे व ट्राफिक वार्डन देणे गरजेचे आहे. यामुळे शरातील वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात कमी होईल.
वाहतूक शाखेच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. सध्यास्थिती वाढती लोकसंख्या पाहता प्रशासनाने या कोंडीवरती उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे, त्यामुळे आवश्यक त्या तरतूदी कराव्यात.

Post a Comment

 
Top