0




मुंबईच्या २६/११ च्या हल्‍ल्याला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्‍ल्यात १६६ जण ठार झाले होते, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हल्‍ल्यात जखमी झालेल्यांपैकी एक होती देविका रोटावन. २००८ मध्ये ती तेव्‍हा ९ वर्षाची होती. या हल्‍ल्यात तिच्या पायाला गोळी लागून ती काही महिने रुग्णालयातच उपचार घेत होती. 

शिवाजी टर्मिनलवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येत होता तेव्‍हा अजमल कसाबने देविका रोटावनच्या पायावर गोळी मारली होती. या घटनेनंतर जखमी देविका जगभरातील लोकांना माहित झाली. न्यायालयात अजमल कसाबचा जेव्‍हा खटला उभा राहिला तेव्‍हा मोठ्या धीराने देविकाने, यानेच माझ्यावर गोळी झाडली असल्याचे न्यायालयात सांगितले होते. या दहशतवादी हल्‍ल्‍यात कसाब एकटाच जीवंत पोलिसांना सापडला होता. 
देविका हल्‍ल्‍यातून बचावली, कसाबला ओळखून न्यायालयात ओळखून हा खटला भारताच्या बाजूने मजबूत केला होता. देविका जगासाठी हिरो असली तरी वास्‍तव जीवनात मात्र ती अधिकच हादरून गेली होती. देविका शाळेत गेली तेव्‍हा तिला सगळं अनपेक्षितपणेच समोर आलं. त्या गोष्टीची तिला कधी अपेक्षा नव्‍हती. शाळेत तिला कुणी मित्र-मैत्रिणी नव्‍हत्या, वर्गातील सगळेजण फटकून वागू लागले. यावेळी तिच्या एक गोष्ट लक्षात आली की, दबक्‍या आणि जाहीररित्या तिला ही कसाबची मुलगी म्‍हणून हेटाळणीही केली जायची असं तिनं माध्यमांशी बोलताना तिनं सांगितलं.
देविकाची हेटाळणी इतकी व्‍हायची की, ती मग रडत रडतच घरी जात असे. रोजच्या हेटाळणीनंतर मात्र तिनं शाळा बदलली. दुसर्‍या शाळेत प्रवेश घेतला. दुसरी शाळा तिथंही मग काही हेटाळणी व्‍हायचीच. शाळेत असतानाच न्यायालयाचा एक भाग बनलेली, दहशतवाद्याला ओळखणारी, पकडून देणारी म्‍हणून तिला घाबरूनही मग शाळेतील मित्र-मैत्रिणी आणि इतर माणसंही राहू लागली. एका शाळेनं तर तिला प्रवेश नाकारला तेव्‍हा तिच्या कुटुंबियांना उत्तर देण्यात आलं की, तिला इंग्रजी चांगलं बोलता येत नाही. हे सगळं तिच्यासाठी धक्‍कादायक होतं, तरीही ते वास्‍तव होतं.
मित्र-मैत्रिणीनं जसं तिच्याकडे पाठ फिरवली होती तसचं त्यांच्या पै-पाहुण्यांनी, शेजार्‍यांनी त्‍यांना वाळीत टाकलं होतं. देविकाचे वडील सांगतात की, खटला चालू होता त्यादिवसापर्यंत अगदी आम्‍हाला धमक्या देण्यात येत होत्या. धमक्यांची तिला भिती वाटायची पण त्या धमक्‍यांना ती कधी डगमगली नाही. 
बांद्र्यामध्ये आजही एका खोलीत देविका, तिचे वडील आणि तिचे दोन भाऊ राहतात. आज ती १९ वर्षाची झाली आहे. तिची वडील एका ठिकाणी कमी पगारात काम करतात तर भावाला कुठलीही नोकरी मिळाली नाही. आता ती अकरावीत शिकते, तिला आयपीएस अधिकारी व्‍हायचं आहे. देविका सांगते की, कसाबला फासावर जाताना बघितलं ते सगळं आनंदी असलं तरी अजून बरचं काम शिल्‍लक आहे ते मला करायचं आहे. 
कसाबविषयी सांगताना म्‍हणते की, मला माहित होतं तो मरणारच आहे, पण दहशतवादाला संपवायचं असेल तर सरकारकडून आणखी कठोर कायदे करणं गरजेचं आहे. मला समाजात शांतता नांदवायाची आहे. या महासागरातील कसाब एक छोटा मासा आहे, पण मला हा महासागर साफ करायचा आहे. एका दहशतवाद्याला मारणं हे चांगलं असलं तरी दहशतवाद मुळापासून काढून टाकणचं आपल्या दृष्टीनं सुखाचं आहे.
देविकावर हल्‍ला झाला त्यावेळी ती पुण्यात काम करणार्‍या आपल्या भावाकडं जात होती. तिच्याबरोबर तिचा लहान भाऊही होता. त्या भयान काळरात्रीची आठवण सांगताना ती म्‍हणते की, आम्‍ही प्‍लॅटफॉर्मवर रेल्‍वेची वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यात स्‍टेशन बाहेर फटाके फुटल्यासारखा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने गोंधळ उडाला. माणसं सैरभैर पळू लागली. माझा भाऊ तेव्‍हा बाथरूमकडे गेला होता. त्याचवेळी एक बंदुकवाला आत स्‍टेशनच्या आत आला. तेव्‍हा माझ्या वडीलांनी मला पळून जायला सांगितलं. मी पळत सुटले तेव्‍हा माझ्या पायात तीव्रपण कसली तरी कळ उटली. पहाते तर माझ्या पायातून भळभळते रक्‍त वाहत होतं ते बघून मी कोसळूनच पडले. 
त्या हल्‍ल्यात जखमी झाल्यानंतर मी दोन महिने जेजे हॉस्‍पिटलमध्ये होते. त्यावेळी माझ्या वडीलांना मी न्यायालयीन खटल्यात जाऊ नये असं त्यांना काळजीपोटी वाटत होतं, पण कालांतराने तेच माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिले. याकाळात माझ्यावर अनेक शस्‍त्रक्रिया करण्यात आल्या. न्यायालयीन खटला उभा राहिला, तेव्‍हा पोलिस मला अनेक प्रश्न विचारायचे, वडील घाबरायचे म्‍हणायचे नको तो खटला. मी बरी झाल्यावर मात्र ते माझ्या पाठीशी खूप धीराने उभा राहिले. 
अजमल कसाबचा खटला सुरू झाल्यानंतर जगाचे लक्ष्य या खटल्याकडे लागून राहिले होते. देविका म्‍हणते की, न्‍यायालयात उज्ज्वल निकम प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे आले आणि मला म्‍हणाले, तुला कुणी गोळी मारली. तेव्‍हा चेहर्‍यावर कोणतेही भाव नसलेला दहशतवादी अजमल कसाब माझ्यासमोर उभा होता. त्यांच्या प्रश्नानंतर मी धाडसाने कसाबकडे बोट करून सांगितले की, यानेच मला गोळी मारली.  
ज्या दहशतवादी हल्‍ल्यानं सारं जग हादरलं होतं. त्यापेक्षा किती तरी मोठा हादरा नटवरलाल कुटुंबाला बसला होता. गोळीबार करणारा अजमल कसाबला ओळखणार्‍या देविकेचे वडील म्‍हणतात की, अनेक माध्यमांनी मुलाखती घेतल्या, फोटो छापले पण मदत म्‍हणून कुणीही केली नाही. देविकाच्या शाळेसाठी कुणीही पुढं आलं नाही. याची ते खंतही व्‍यक्‍त करतात. सरकारकडून त्यांना घर देण्याचे अश्वासन देण्यात आले होते मात्र घर काही मिळाले नाही. या घटनेत तिचा भाऊही होता. तो म्‍हणतो की, आधीच आमची आई गेली होती, आणि आता माझ्या बहिणाला मला गमवायचं नव्‍हतं. ती रुग्णालयात असताना दु:ख विसरण्यासाठी तो तिला जोक वगैरे सांगायचा पण ते तेवढ्यापुरतं असायचं असं ती सांगते. 
देविका म्‍हणते आजही मी जेव्‍हा त्या जागेवर जातो तेव्‍हा जिथं मला गोळी लागली होती. आजही मला तेच चित्र दिसतं स्‍टेशनवरची माणसं खूप वेगानं पुढं धावत आहेत, पळत आहेत. त्या सगळ्या आठवणी मला खूप भेडसावणार्‍या वाटतात, पण मला पुन्‍हा त्यावेळची एक आठवण येते. त्यावेळी मी ठरवलं होतं की, माझ्या वडिल, भाऊ आणि माझ्या देशाला एक चांगलं भविष्य द्यायचं आहे. मला आयपीएस बनायचं आहे. दहशतवादाविरोधात लढायचं आहे आणि माझे वडील आणि भावासारखा संघर्ष करणार्‍यांना न्याय मिळवून द्यायचा आहे 



Post a Comment

 
Top