0
येथील जय महाराष्ट्र महिला बचत गटाच्या सचिव व जयसिंगपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. करुणा अजितराव पवार यांना राष्ट्रमाता जिजाऊ महिला विकास प्रबोधन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योगपती अशोकराव शीलवंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हरोली येथील भीमक्रांती सोशल फौंडेशन यांच्यावतीने देश व राज्यपातळीवरील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. अध्यक्षस्थानी जालन्याचे माजी आमदार मदनलाल कुलकर्णी होते. नांदणी रस्त्यावरील कृष्णा हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी केले. प्रतिमापूजन दलितमित्र सर्जेराव गायकवाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी सौ. करुणा पवार यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र या स्वरूपात पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी राधानगरीच्या तहसिलदार शिल्पा ओसवाल, पंचायत समिती उपसभापती संजय माने, अशोक कांबळे, छाया शिंदे, खंडेराव हेरवाडे, सौ. मंगला कांबळे, श्रीमती राजश्री पवार, सौ. मीना साळोखे, सौ. योगिता पवार, सौ. ज्योती कांबळे, सौ. नम्रता पवार, सौ. नीता रजपूत, नयन पवार, प्रणव पवार, शंभूराज पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार विशाल चिगरे यांनी मानले.

Post a Comment

 
Top