मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वांना परिचित आहे. अर्जुनने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली आहे.अंडर-19 कूच बेहार ट्रॉफीमधील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने भेदक गोलंदाजी करत पाच बळी मिळवले.फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या अर्जुनने आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं.चिन तेंडुलकरदेखील ही मॅच बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणास्तव सचिन ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही.अर्जुन तेंडुलकर हा काही दिवसांपूर्वी भारताच्या अंडर-19 संघाबरोबरही श्रीलंका दौऱ्यासाठी गेला होता. पण या दौऱ्यात अर्जुन समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.


Post a Comment