0
म्हापसा दत्तवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यमाहा सर्व्हिस सेंटरच्या प्रतीक मोटर्सच्या कार्यालयाला काल सकाळी 8.30 वा आग लागली. या आगीत कार्यालयातील कागदपत्रे, लॅपटॉप, गाडय़ांचे पार्ट आदी सामान जळाल्याने सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉटसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी 8.30 वा. दरम्यान ही आग लागली. वर्कशॉप व्यवस्थापकांनी या घटनेची माहिती त्वरित म्हापसा अग्निशामक दलास दिल्यानंतर उपअधिकारी शिवाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गवंडी, परेश मांद्रेकर, सागर कुंकळय़ेकर यांनी ही आग विझविली.
दरम्यान म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव म्हणाले की, याबाबत म्हापसा पोलिसांकडे पंचनामा व वीज खात्याच्या अधिकाऱयांकडे आगीचे कारण मागितले आहे. या आगीत अंदाजे 4 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र शोरुम मालकाने 9 लाखाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

 
Top