0
जयपूर - राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी भाजपा नेते समरथ कुमावत यांची शनिवारी हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी सुरुवातीला कुमावत यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तलवारीनं त्यांचा गळा कापला.  प्रतापगड शहरापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेत कुमावत यांचा जागीच मृत्यू झाला. कुमावत यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
या घटनेचा भाजपाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करुन, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.  दरम्यान, कुमावत यांची कोणाही सोबत वैर नव्हते, ते भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. 
तर दुसरीकडे, काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 'भाजपाच्या समरथ कुमावत यांच्या क्रूर हत्येची मी निंदा करतो. आरोपींना गंभीर स्वरुपात शिक्षा केली गेली पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती हा चिंतेचा विषय आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. 

bjp leader samrath kumawat shot dead then chopped off in rajasthans pratapgarh | भाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा

Post a Comment

 
Top