0
 • पैठण - जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने गुरुवारी पाच धरणांतून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. यात दारणा धरण ते जायकवाडीदरम्यानचे अंतर सुमारे २०० किलोमीटरचे असून मुळाचे अंतर १०१ किमी आहे. दरम्यानचे २६ बंधारे पार करत हे पाणी जायकवाडी धरणात नाशिक व नगर जिल्ह्यातून सोडले आहे. नाशिक ते जायकवाडीदरम्यान लहान-मोठे १४ बंधारे असून नगरमार्गे १२ बंधारे पार करत पाणी जायकवाडीत २२ तासांत येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

  जायकवाडीत यंदा पावसाळ्यात वरील धरणातून केवळ ओव्हरफ्लोचे पाणी सोडले. त्यावर जायकवाडीचा पाणीसाठा ४६ टक्क्यांवर आला. मात्र, त्यातून पैठणमधील दोन बंधारे व दोन्ही कालव्यातून मराठवाड्यातील शेतीला पाणी दिल्याने आता धरणात ३० टक्के पाणी शिल्लक असून समन्यायी पद्धतीने गुरुवारी पाच धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यात आले आहे. यातील मुळा, दारणा, पालखेड, गंगापूर या धरणाचे अंतर व नदीपात्रातील खड्डे पाहता पाणी येण्याचा वेग मंदावणार असून यात साधारणपणे सोडलेल्या ८.९९ पैकी साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत येईल, असे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात अाले. यापूर्वी २०१५ मध्ये वरील धरणांतून साडेबारा टीएमसी पाणी सोडले होते. तेव्हा जायकवाडीत केवळ ६.६ टीएमसी पाणी आले होते. यंदा नदी पात्र पूर्णपणे कोरडे नसले तरी पात्रात वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे ५ टीएमसी पाणीच पोहोचण्याची शक्यता आहे.
  सोडलेल्या पाण्याचा २२ तासांचा प्रवास : २६ बंधाऱ्यांतून पाणी खळखळणार, जायकवाडीत पाणी अाल्यावर साठा पाेहोचेल ३६%पर्यंत
  पाण्याला पार करावे लागणार अडथळे 
  नाशिक ते पैठणच्या गोदावरी नदीपात्रात वर्षभरापासून बेसुमार अवैध वाळूचा उपसा झालेला आहे. कायगाव टोका ते जायकवाडी धरण हा काही किमीचा गोदावरीचा भाग वगळता गोदावरी पात्रात मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे पाण्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे साधारणपणे २२ तासांत दाखल होणारे जायकवाडीत पाण्याला पोहोचण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता अशोक चव्हाण म्हणाले.
  गंगापूर धरण 
  वेळ : दुपारी १२ वा 
  विसर्ग : ३५२४ क्युसेक

  दारणा धरण 
  वेळ : दुपारी १ वा 
  विसर्ग : २६१६ क्युसेक
  निळवंडे 
  वेळ : सकाळी ८:३० वा. 
  विसर्ग : ६०५० क्युसेक
  नांूुर मधमेश्वर ते जायकवाडी अंतर : १५४ किमी 
  २२ तासांचा कालावधी
  मुकणे धरण 
  वेळ : सकाळी १० वा 
  विसर्ग : १००० क्युसेक
  मुळा धरण 
  वेळ : सकाळी ९ वा 
  विसर्ग : २००० क्युसेक
  नाशिक, नगरच्या पात्रातील मोटारी काढण्याच्या शेतकऱ्यांना सूचना 
  नाशिक व नगर जिल्ह्यातील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून चार हजारच्या वर शेतकऱ्यांना नदीपात्रातील मोटारी काढण्याच्या सूचना केल्या आहेत. काही मोटारी काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी मोटारी काढल्या जाणार नाहीत तेथे पोलिस बंदोबस्तात काढल्या जाणार असल्याची माहिती पथक प्रमुख तथा कार्यकारी अभियंता आर.पी.काळे यांनी दिली. जायकवाडी धरणात आज समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्यात आले असून गोदावरी काठावरील सर्व कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश असले तरी नाशिक, नगर जिल्ह्यातील जवळपास चार हजार कृषी पंप हे विजेवर नसून डिझेल इंजिनवर आहेत. सध्याही पाणी उपसा होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
  खड्ड्यांमुळे वेग मंदावण्याची शक्यता 
  नदीपात्रामध्ये माेठ‌्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याने खड्डे पडले अाहेत. याचा परिणाम पाण्याच्या वेगावर हाेण्याची शक्यता अाहे. खड्ड्यांमुळे पाण्याचा वेग मंदावेल. दाेन ते तीन तासांच्या विलंबाने पाणी जायकवाडीच्या पात्रात येईल. गंगापूरमध्ये सकाळी पाणी साेडण्यात अाल्यानंतर याला स्थगिती देण्यात अाली अाहे. मात्र, इतर धरणांतून पाणी साेडण्यात अाल्याने ते पाणी लवकरच पात्रात येईल. -अार. पी. काळे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी
  पाच धरणांतून जायकवाडीसाठी पाणी साेडले 
  जायकवाडीत आज पाच धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी नदीपात्रातील खड्डे व वीज मोटारींचा उपसा नाही झाला तरच २२ तासांत जायकवाडीत दाखल होईल, साधारणपणे साडेपाच टीएमसी पाणी येईल. -अशोक चव्हाण, शाखा अभियंता, जायकवाडी
  २०१५ ला निम्मेच पाणी 
  यापूर्वी जायकवाडीत सन २०१५ मध्ये साडेबारा टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्या वेळी जायकवाडीत ६.६ टीएमसी एवढे पाणी आले होते. आता त्यापेक्षा कमी पाणी सोडले आहे. तेव्हाचा विचार करता आता धरणात साडेपाच टीएमसी पाणी येण्याचा अंदाज आहे.
  आणखी एक पाणी आवर्तनाची शक्यता 
  साधारणपणे साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत येईल. यावर धरणाच्या साठ्यात ५ ते ६ % पाणी वाढणार आहे. त्यावर धरणाची पाणी पातळी ३६ टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीला एक पाणी पाळी मिळण्याची शक्यता आहे.

  अहमदनगर-नाशिक परिसर पात्रातील माेटारी काढण्याच्या सूचना, रब्बीसाठी अावर्तनाच्या लाभाची शक्यता

  • News aout Jayakwadi Dam water

Post a Comment

 
Top