0

अकोला: डाबकी रोडवरील श्रीवास्तव चौकातून दुचाकीने जात असलेल्या वैद्यकीय प्रतिनिधीस एका भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात गंभीर जखमी युवकाचा मंगळवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बाळापूर तालुक्यातील कवठा येथील रहिवासी तथा वैद्यकीय प्रतिनिधी योगेश गिरीधारी अंबुसकर (३२) हे मंगळवारी सकाळी एम एच ३० एजी २८८४ क्रमांकाच्या दुचाकीने कार्यालयीन कामानिमित्त जात असताना कामगार कल्याण केंद्रासमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या एम एच ४१ जी ५६६४ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात योगेश अंबुसकर गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने योगेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी ट्रकचालक अहमदनगर येथील रहिवासी अनिल अशोक गेठे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यासमोरच एवढा गंभीर अपघात झाल्याने नागरिक अवाक झाले आहेत.
 Youth killed in an accident in akola city | भरधाव ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Post a Comment

 
Top