रामल्ला- पॅलेस स्टाईल आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्त्व सर्वश्रृत आहे. मागील 50 वर्षांपासून सुरु झालेला हा वाद आजही कायम आहे. इस्रायलमध्ये राहात असलेल्या पॅलेस स्टाईलमधील विवाहित महिलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिलांचे पती इस्रायलच्या तुरुंगात कैद आहेत. परंतु या महिला खचल्या नाहीत. आई बनण्यासाठी या महिला तुरुंगात कैद असलेल्या पतीच्या स्पर्मचा वापर करतात. तस्करीच्या माध्यमातून या महिला पती स्पर्म मागवत असल्याची माहिती समोर आली आहे.
येरुशलममधील जबाल-अल मुकाबर भागात राहाणारी सामिया मशाहरा हिचा पती फाहमी हा मागील 16 वर्षांपासून तुरुंगात कैद आहे. सामिया हिला तीन अपत्ये आहेत. त्यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सामियाच्या तिन्ही मुलांचा जन्म तस्करीतून मागविण्यात आलेल्या स्पर्मने झाला आहे. फाहमीचा स्पर्म तुरुंगातून तस्करीच्या माध्यमातून आणला होता. या कामात फाहमीच्या आईची भूमिका महत्त्वाची होती. फाहमीची तुरुंगातून सुटका होईल, ही अपेक्ष सामियासह तिच्या कुटुंबाला आहे.
करंट किंवा सुटका झालेल्या कैदीच्या माध्यमातून होते स्पर्मची तस्करी...
कैद्यांसाठी कार्यरत असणारी येरुशलम सिव्हिल समितीचे अमजद अबु असाब यांनी सांगितले की, विद्युत करंट किंवा सुटका झालेल्या कैदीच्या माध्यमातून तुरुंगातील कैद्यांच्या स्पर्मची तस्करी केली जाते. त्यानंतर त्यांच्या पत्नी आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) लॅबमध्ये जाऊन गर्भधारण करून घेतात.
कैद्यांसाठी कार्यरत असणारी येरुशलम सिव्हिल समितीचे अमजद अबु असाब यांनी सांगितले की, विद्युत करंट किंवा सुटका झालेल्या कैदीच्या माध्यमातून तुरुंगातील कैद्यांच्या स्पर्मची तस्करी केली जाते. त्यानंतर त्यांच्या पत्नी आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) लॅबमध्ये जाऊन गर्भधारण करून घेतात.
सौद या महिलेने तुरुंगात कैद असलेल्या पतनीच्या स्पर्मने मुलगी हुर्रिया हिला जन्म दिला आहे. सौद हिचा पती समीर अबु फैयाद हा मागील 18 वर्षांपासून तुरुंगात कैद आहे. दहतवादी कारवाईत त्याचा सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
दरम्यान, इस्रायलच्या अधिकार्यांनी तुरुंगातून स्पर्मची तस्करी होत असल्याचा दावा फेटाळला आहे. कडक सुरक्षेत कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांना भेटू दिले जाते. त्यामुळे तुरुंगातून कोणतीही वस्तू बाहेर जाऊ शकत नाही.
इस्रायलमधील तुरुंगात 5 हजारहून जास्त पॅलेस स्टाईनचे..
संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इस्रायलमधील तुरुंगात 5500 पॅलेस स्टाईलमधील नागरिक कैद आहेत.

Post a Comment