मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा सिझन आहे. नुकताच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता जोधपुरमध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्रा अमेरिकेतील सिंहर निक जोनससोबत 2 डिसेंबर रोजी लग्न करत आहे. तसेच कॉमेडिअन कपिल शर्मा देखील पुढल्या महिन्यात गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. वर्ष सरता सरता अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात झाले असताना आणखी एका अभिनेत्याची लग्नाची बातमी समोर आली आहे.
आता अशी माहिती मिळतेय की, 42 वर्षांचा रणदीप हु्ड्डा लवकरच लग्न करणार आहे. आपल्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रणदीप लग्न करत आहे. तसेच लग्नानंतर हे दोघे अमेरिकेत स्थायिक होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, रणदीप हुड्डा आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड नीतू चंद्रा यांच पुन्हा नातं सुरळीत सुरू आहे. गायक आदेश श्रीवास्तव याच्या मुलाच्या गाण्याच्या लाँचवेळी ही बातमी समोर आली. 

Post a Comment